नोकरदार वर्गाला मोठा दिलासा..
नवी दिल्ली।
दि. २१ (लोकमत न्यूज नेटवर्क)
वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नोकरदार व्यक्तींसाठी एक शुभ वर्तमान आहे. या श्रेणीत उत्पन्न असलेल्या लोकांना चालू आर्थिक वर्षात रिटर्न भरण्याची गरज नाही. केंद्रीय वित्तमंत्रालयाने आज या संदर्भातील अधिसूचना जारी करीत देशभरातील सुमारे ८५ लाख नोकरदारांना खूशखबर दिली आहे.
ज्या नोकरदार व्यक्तीचे पगारातून मिळणारे उत्पन्न, बँक खाते अथवा अन्य मार्गातून मिळणारे उत्पन्न (मात्र वर्षाला उत्पन्न र्मयादा पाच लाख किंवा त्या आत) आहे, त्यांना रिटर्न भरण्याची गरज नसल्याचे या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे या वर्षी आपापल्या कंपनीतून मिळणार्या फॉर्म-१६नुसार आपल्याला रिटर्न भरण्याची गरज नाही.
सध्या वर्षाकाठी १ लाख ८0 हजार ते ५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांसाठी १0 टक्के प्राप्तिकर आकारणी होते. ५ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या लोकांना २0 टक्के तर ८ लाखांवरील उत्पन्नासाठी ३0 टक्के कर आकारणी होते. मात्र, पगाराखेरीज अन्य उत्पन्न नसलेल्या आणि विशेषत: पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांची संख्या ८५ लाखांच्या घरात आहे. त्यांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे असल्याने, पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
..तर रिटर्न भरा
- टॅक्स कापला असेल आणि
टॅक्स बचत योजनांनुसार केलेल्या गुंतवणुकीतून अथवा अन्य प्रकारे तुम्हाला रिफंड मिळणार असेल तर रिटर्न भरणे गरजेचे आहे.
- तुम्हाला गृह कर्ज काढायचे असेल तर, किमान तीन वर्षांचे रिटर्न्स जोडावे लागतात; म्हणूनही रिटर्न आवश्यक.
- अमेरिका, युरोपसह किमान २५ देशांत जाण्यासाठी आवश्यक असलेला व्हीसा प्राप्त करण्यासाठी रिटर्न भरणे गरजेचे आहे.

source : http://onlinenews1.lokmat.com
No comments:
Post a Comment