Blogger Widgets Blogger Widgets

Friday, March 02, 2012

युवकांनो एकमेवाद्वितीय बना! माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आवाहन


(02-03-2012 : 00:10:56)  
सोलापूर। दि. 1 (प्रतिनिधी)
आयुष्यात सतत उच्च ध्येय ठेवा.. सवरेत्कृष्ट ज्ञान मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करा.. त्यासाठी खडतर परिश्रम घ्या.. त्या बळाच्या जोरावर येणा:या संकटांना धैर्याने सामोरे जा.. कोणत्याही क्षेत्रात युवकांनो एकमेवाद्वितीय बनण्याचा ध्यास घ्या, असे मौलिक आवाहन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी केले.
सोलापूर सायन्स सेंटरमध्ये डॉ. कलाम यांनी युवकांशी चर्चा करताना त्यांच्या हृदयाला साद घातली.
यावेळी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, कुलगुरू बाबासाहेब बंडगर, जि.प. अध्यक्ष काका साठे, महापौर आरिफ शेख, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, मनपा आयुक्त अजय सावरीकर उपस्थित होते. शास्त्र आणि तंत्रज्ञानाची जोड आज जगाला पुढे नेऊ शकते.

आज तुम्हाला विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांच्याप्रमाणे उच्च पदावर जायचे असेल तर स्वत:ला सर्वोच्च ध्येयामध्ये रूपांतरित करा. हजारो युवकांनी झपाटून अजोड बनण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. ग्रॅहम बेल, थॉमस एडिसन, राईट बंधू, सी. व्ही. रामन, रामानुजन यांना लोक आजही ओळखतात, कारण त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेली अत्युच्च कामगिरी. प्रत्येकाने यासाठी दिवस-रात्र कार्य केले पाहिजे.
शास्त्र म्हणजे काय? हे सांगताना डॉ. कलाम यांनी अनेक उदाहरणे दिली. शास्त्राच्या खांद्यावर तुम्ही उभे आहात. आविष्कार आणि शोधनिर्मिती ही तत्पर मनाची प्रक्रिया आहे. सततच्या प्रयत्नांनी मने प्रफुल्लित होतात. आजही अनेक क्षेत्रात विकास संशोधनाला वाव आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा अनेक क्षेत्रात संशोधनासाठी विद्याथ्र्यानी पुढे आले पाहिजे. शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नातून नवे संशोधन विकसित होऊ शकते. विद्याथ्र्यानी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, यासाठी विद्याथ्र्यानी पुढे यावे, असे आवाहन डॉ. कलाम यांनी केले.
कलाम यांची शपथ
प्रारंभी डॉ. कलाम यांनी विद्याथ्र्याना शपथ दिली. मी जन्मत:च सामथ्र्यवान आहे. चांगुलपणा आणि विश्वास माङया अंगात आहे. कल्पना आणि उच्च स्वप्ने मी अंगी बाळगीन. विश्वास आणि उडण्याचे ध्येय माङया अंगी आहेत. मी सतत उडत राहीन, उडत राहीन आणि उडत राहीन..

No comments:

Post a Comment