Blogger Widgets Blogger Widgets

Monday, May 14, 2012

लैंगिक शोषणाची बळी ठरलेल्या मुलीची व्यथा ऐकतांना आमिरचे डोळे पानावले

आमिर खानचा टेलिव्हिजन शो 'सत्यमेव जयते'च्या दुस-या भागात बालकांच्या लैंगिक शोषणाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. अतिशय संवेदनशिल विषयाला आमिरने हात घातल्याने, या संपूर्ण कार्यक्रमात धीरगंभीर आणि भावूक वातावरण होते. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमला चांगला प्रतिसाद मिळाला. 

कार्यक्रमाच्या शेवटी अभिनेत्री श्रीदेवी मंचावर आली, त्यानंतर वातावरण थोडे हल्केफुल्के झाले.  नाहीतर संपूर्ण कार्यक्रम हा तणाव आणि अश्रूंनी भरलेला होता. बॉलिवूडमधील ४८ वर्षीय अभिनेत्री श्रीदेवी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रथमच आमिरसोबत स्क्रिनवर दिसली.  बाल लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या हरिष आय्यरला भेटण्यासाठी ती या कार्यक्रमात सहभागी झाली होती. सलग ११ वर्ष हरिषचे लैंगिक शोषण सुरु होते. या काळात त्याला जगण्याचे बळ हे श्रीदेवीच्या चित्रपटातून मिळाल्याचे तो म्हणाला.
 

कार्यक्रमात आमिरने इतरही काही पिडितांशी संवाद साधला.  सिंड्रेला प्रकाश हिने सांगितले की, ती केवळ १२ वर्षांची असतांना ५५ वर्षीय व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले. ती हे सांगत असताना आमिरच्या डोळ्यातही अश्रू तराळले. 

पाहा या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ. 
sourcehttp://divyamarathi.bhaskar.com//article/BOL-aamir-wept-in-the-satymev-jayte-3264159.html?SL2=

No comments:

Post a Comment